India’s Vision: Global Sports Leader
Townsol
March 27, 2026
Opportunity for award winner players to start training institute with no investment
तुम्ही ज्या खेळात निष्णात आहात …….ज्या खेळाबद्दल तुम्हाला आवड आहे, आत्मीयता आहे….त्याबद्दल थोडेसे...
तुम्ही तुमच्या खेळातील शासकीय, अशासकीय, खाजगी, सार्वजनिक अशा सामन्यांमध्ये भरघोस यश मिळवले आहे………awards, medals मिळवलेली आहेत
आणि
तुम्हाला वाटतं आहे कि मी आता माझ्यासारखे खेळाडू पुढील पिढीत घडवू शकतो…..
तर
TownsSolSPORTS हा क्रीडा मंच तुमच्यासाठी आहे.
आपल्या आजूबाजूला असलेल्या भागामधून तुमच्या खेळाची आवड असलेल्या मुलामुलींना तुमचा खेळ खेळण्याकरिता प्रवृत्त करा, खेळाचे महत्व समजावून सांगा…..खेळामधूनसुद्धा आपले career घडू शकते ह्याबद्दल माहिती द्या …..आणि आपला ग्रुप तयार करा…..आपल्या मंचाचे विविध features वापरून आपण आपली स्वतःची ट्रैनिंग इन्स्टिटयूट, क्लब किंवा अकादमी चालू करू शकता. कालांतराने तुम्ही तुमची हि इन्स्टिटयूट असोसिएशन बरोबर रजिस्टर करू शकता. त्यानंतर शक्य असेल तर तुम्ही खेळाडूंकडून मानधन देखील मिळवू शकता.
इथे शाळा कॉलेज मध्ये गेलेले नसले तरी केवळ खेळाची आवड आहे म्हणून बरेच जण तुमचा ग्रुप जॉईन करू शकतात, हे लक्षात घ्या.
अशा प्रकारे आपला संघ तयार करून तुम्ही विविध स्तरावर सराव सामन्यात (प्रॅक्टिस मॅच) भाग घेऊ शकता.
आपल्या क्रीडा मंचाच्या माध्यमातून तुम्ही स्वतः जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा सामने आयोजित करू शकता.
ह्यामुळे तुमच्या संघाला स्पर्धात्मक सामन्यासाठी तयार होण्याकरिता संधी मिळेल, कोणत्याही स्पर्धात्मक सामन्यात भाग घेण्यासाठी आत्मविश्वास मिळेल आणि स्पर्धेत यशस्वी होण्याचे सर्व डावपेच आत्मसात होतील.
अशा प्रकारे, आपण आपल्या संघाला (टीमला) सरकारमान्य राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये यशस्वीपणे आणि आत्मविश्वासाने खेळण्यास तयार करू शकता.
हे सर्व होत असताना आपला खेळ आवर्जून बघणारा एक नवीन प्रेक्षक वर्ग तयार होईल कि जो खेळाडूंना प्रोत्साहन आणि स्फूर्ती देईल म्हणजेच आपल्या गावात एक क्रीडा संस्कृती निर्माण होईल.
चला तर मग आपण सर्वजण मिळून ओलीम्पिकवर वर्चस्व गाजवुया
भारताला Global Sports Leader बनवूया !
जय भारत !!!
Share your thoughts in the comments below.
Create an account to write a response.