India’s Vision: Global Sports Leader
Townsol
March 27, 2026
दरवर्षी प्रत्येक शाळेत पहिलीच्या वर्गात मुले मुली दाखल होतात कि जी पुढे जाऊन एक नवीन पिढी म्हणून उभी राहते ह्याचाच अर्थ असा कि जसे प्रत्येक वर्षी पुस्तकी ज्ञानाचे अध्ययन करण्यासाठी पालक मुलांना शाळेत दाखल करतात तसेच, त्याच वेळी पालकांनी जर मुलांना कोणत्या ना कोणत्या तरी खेळाचे आकलन होणे सुद्धा अतिशय आवश्यक आहे असा जर दृष्टिकोन ठेवला तर मुलांच्या बौद्धिक संवर्धनाबरोबर शारीरिक संगोपन सुद्धा तितक्याच प्रभावीपणे आणि परिणामकारक होऊ शकेल हा विचार आपल्याला सर्वमान्य करावयाचा आहे, समाजाच्या प्रत्येक थरात यशस्वीपणे अंमलात आणावयाचा आहे.
तसे पहिले तर, प्रत्येक खेळाचे खालील फायदे सर्वाना माहित आहेत पण त्याबद्दल समाज आग्रही असल्याचे दिसत नाही असे आम्हाला वाटते म्हणूनच खेळाच्या ह्या मूल्यांचा प्रसार करणे आवश्यक आहे.
शारीरिक - शरीर बळकट व मजबूत होते.
सामाजिक - खेळाच्या सामन्यामुळे समाजात सतत चैतन्यमय वातावरण निर्माण होते.
आर्थिक - खेळाच्या विविध कार्यक्रमांमुळे गावात नवीन व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात.
वैचारिक - शरीर सुधृढ असेल तरच बौद्धिक पात्रता वाढत राहते.
मानसिक - हरल्यानंतरसुध्दा पुन्हा पेटून उठायची सवय लागते मग आयुष्यात कोणताही प्रसंगात हरलो तरी बेहत्तर अशी मनाची तयारी होते.
(आणखीन काही तुम्हाला सुचत असेल तर खाली कॉमेंट मध्ये सांगा )
हे समाज कार्य आपण कोणताही मोबदला ना घेता, एक volunteer म्हणून काम ना करता, आपला व्यवसाय म्हणून तुम्ही करायला हवे असे आम्हाला वाटते म्हणूनच आम्ही हि एक संधी म्हणा किंवा व्यावसायिक पद म्हणा, निर्माण केलेले आहे कि ज्या व्यवसायाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे आपण राहत असलेल्या परिसरात, मित्र मंडळी, नातेवाईक ह्यांच्या कुटुंबात, क्रीडा संस्कृती सतत क्रियाशील आणि सातत्याने वाढत राहील ह्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व सुविधा, साधने, संधी, व्यवस्था ह्याची उपलब्धता कायम असावी. हा ह्या व्यवसायाचा कार्यभाग आहे.
तुम्ही स्वतःची आणि व्यवसायाची ओळख - मी क्रीडा विकास associate (Sports Development Associate) आहे, असे करू शकता जसे कि कोणत्याही उद्योगामध्ये बिझिनेस मॅनेजर, मार्केटिंग मॅनेजर, मार्केटिंग असोसिएट वगैरे पद असतात, तसेच हे एक मानाचे पद आहे.
ह्या उद्योगाचा विस्तार अमर्यादित होऊ शकतो त्याचे कारण म्हणजे सुमारे ५० हुन अधिक वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आज भारतात आणि जगात खेळले जात आहेत मग विचार करा कि प्रत्येक जिल्ह्यामध्ये इतके खेळ सातत्याने क्रियाशील ठेवायचे म्हणजे बराच मोठा व्याप आहे, हे लक्षात घ्या.
आता क्रीडा संस्कृती म्हणजे काय ? तर गावातील, शहरातील, खेडेगावातील - प्रत्येक कुटुंबात कोणत्या ना कोणत्या तरी किमान एका खेळाची तरी सतत चर्चा होत राहणे म्हणजे गावात क्रीडा संस्कृती आहे असे म्हणता येईल. असे झाले तर प्रत्येक खेळाला आपला असा एक प्रेक्षक वर्ग मिळेल कि जो प्रत्येक तरुणाला त्या खेळामध्ये भाग घेण्यास प्रवृत्त करेल.अशा प्रकारे प्रेक्षक आणि खेळाडू ह्यांची यशस्वी सांगड घालणे म्हणजे क्रीडा संस्कृती उभी करणे होय.
विचार करा. क्रीडा संस्कृतीच्या सभासद संख्येमध्ये, समाजाच्या सहभागामध्ये वाढ करण्याचा हा व्यवसाय आपणाला करावा वाटत असेल तर आपण इथे APPLY करा.
Share your thoughts in the comments below.
Create an account to write a response.